अर्थव्यवस्थेचे क्षेत्र

अर्थव्यवस्था – तीन क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे –

  1. प्राथमिक क्षेत्र (Primary sector) 🌾🌳🎋
  2. दुय्यम क्षेत्र/ द्वितीय क्षेत्र (Secondary sector)  🏭🚗🧑‍🏭
  3. तृतीयक क्षेत्र (tertiary sector) 👨🏻‍🏫💻🏥

या तीन क्षेत्रांचा शोध घेण्यापूर्वी आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे –

‘अर्थव्यवस्था’ ही एक अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे देश किंवा समाज उपलब्ध संसाधनांचा  वापर करण्याचे नियोजन आणि आयोजन करतो . अशा व्यवस्थेचा उद्देश मर्यादित संसाधनांचा वापर करणे आणि आवश्यक वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे हा असतो. एक सिस्टम म्हणून अर्थव्यवस्था समाजात स्थिरता राखण्यास मदत करते.


अर्थव्यवस्थेचे ३ क्षेत्र

या क्षेत्रांचे विभाजन अर्थव्यवस्थेत केल्या जाणाऱ्या आर्थिक गतीविधींच्या प्रकारांवर आधारित आहे. अशा आर्थिक गतीविधींचे ३ आर्थिक क्षेत्रांमध्ये वर्गीकरण:

👇

१. प्राथमिक क्षेत्र – 🎋🌾🌳

मुळात या क्षेत्रात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. येथे लोक कच्चा माल आणि वस्तूंच्या उत्पादनासाठी थेट निसर्गावर अवलंबून असतात.

यामध्ये प्राथमिक क्षेत्रातील आर्थिक उपक्रम आहेत जे पुढील आर्थिक उपक्रमांसाठी(कारखान्यासाठी) कच्चा माल पुरवतात.

>> खाणकाम, कृषी आणि इ. उपक्रम, वनीकरण, मासेमारी, पशुधन, इत्यादी कार्य प्राथमिक क्षेत्राशी संबंधित आहेत.

या क्षेत्रात कृषी आणि संलग्न व्यवसायांचे वर्चस्व आहे म्हणून या क्षेत्राला कृषी क्षेत्र असे म्हणतात .


अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील क्रियाकलाप
आर्थिक क्रियाकलाप . क्रेडिट आणि स्रोत: एनसीईआरटी

२. दुय्यम क्षेत्र – 🏭🧑‍🏭🚗

या क्षेत्रात उत्पादनाशी संबंधित आर्थिक क्रियांचा समावेश होतो. कच्च्या मालापासून काहीतरी उपयुक्त बनवणे हा या क्षेत्राचा मूलभूत विषय आहे. दुय्यम क्षेत्रातील क्रियाकलापांमध्ये वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी लोक प्राथमिक क्षेत्राच्या उत्पादनावर अवलंबून असतात.

>> इमारती, रस्ते, पायाभूत सुविधा प्रकल्प, इत्यादींचे बांधकाम हे दुय्यम क्षेत्रात आहे.

>> कारखान्यांमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन देखील दुय्यम क्षेत्रात मोजले जाते.

>> अन्न प्रक्रिया कारखाने, धान्यापासून पीठ बनवणे, प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनापासून उत्पादने बनवणे आणि ते पुढे विकणे किंवा त्या वस्तू वापरणे अश्या सागळ्या आर्थिक क्रिया या द्वितीय क्षेत्रात येतात.

या क्षेत्रावर उत्पादन क्रियाकलाप आणि उद्योगांचे वर्चस्व आहे म्हणून या क्षेत्राला ‘उत्पादन क्षेत्र‘ किंवा ‘औद्योगिक क्षेत्र‘ म्हणून ओळखले जाते .

३. तृतीयक क्षेत्र – 👨🏻‍🏫🏥💻

या तिसऱ्या क्षेत्रात सेवांशी संबंधित आर्थिक क्रियाकलापांचा समावेश आहे. या क्षेत्रातील लोक प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रांना विविध सेवा प्रदान करतात. हे क्षेत्र प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रांमध्ये सहभागी असलेल्या क्रियांना आधार देणाऱ्या सेवा प्रदान करते. हे सेवा क्षेत्र तृतीयक क्षेत्रातील आर्थिक क्रियानं देखील आधार देते.

>> शिक्षण – शाळा, कोचिंग संस्था, गायन वर्ग, पोहण्याचे वर्ग, इ. तृतीयक क्षेत्रातील आर्थिक गतीविधी आहेत.

>> विमा सेवा, बँका, वाहतूक आणि रसद इ.

>> फळे आणि भाजीपाला विक्रेते, ड्रायव्हर, शिक्षक, डॉक्टर, वकील, पायलट इ. चे कार्य तृतीयक क्षेत्रात गणले जाते.

या क्षेत्रावर सेवा क्षेत्राचे वर्चस्व आहे म्हणूनच त्याला ‘सेवा क्षेत्र’ असे म्हणतात .

हे क्षेत्र वेगळे किंवा स्वतंत्र नाहीत तर एकमेकांवर अवलंबून  आहेत . आपण पाहिले की सेवा क्षेत्र इतर दोन क्षेत्रांना मदत करते तसेच इतर दोन क्षेत्रे सेवा क्षेत्राला मदत करतात आणि अश्याच प्रकारे सर्व क्षेत्रे एकमेकांना मदत करतात. एक आय. टी. कंपनी एका कापड उत्पादन कंपनीला संगणक आणि कॉल सेंटर ची सेवा पुरवते जे अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांच्या परस्परावलंबनाचे एक सोप उदाहरण आहे.


३ क्षेत्रांचे परस्परावलंबन

देशाचा जी.डी.पी. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या तिन्ही क्षेत्रांमधील सर्व अंतिम उत्पादनाची बेरीज.


भारताच्याव (अर्थव्यवस्था) GDP मध्ये कोणत्या क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त आहे ?

हा डेटा आर्थिक वर्ष-२४ (एप्रिल, २०२४ – मार्च, २०२५) चा आहे.

  1. कृषी क्षेत्राचा जी.डी.पी. मध्ये १६% वाटा आहे. २०१७-२०२३ दरम्यान या क्षेत्राची वार्षिक वाढ फक्त ५% होती.
    • कृषी आणि संलग्न क्षेत्रात कार्यरत असलेले कामगार संख्या जवळजवळ ४६% आहे. याचा अर्थ आपल्या देशातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
  2. उत्पादन क्षेत्राचा जी.डी.पी. मध्ये सुमारे २८% वाटा होता.
    • भारताला अश्या उद्योग क्षेत्राची गरज आहे जे वेगाने वाढेल आणि रोजगार निर्माण करेल.
  3. सेवा क्षेत्राचा आपल्या जी.डी.पी. मध्ये सुमारे ५६% वाटा आहे. भारताच्या जीडीपीमध्ये तृतीयक क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे.
    • आपल्या जी.डी.पी. मध्ये सर्वात मोठा वाटा देणारे हे क्षेत्र आहे पण आपल्या देशातील फक्त ३०% कर्मचाऱ्यांना रोजगार देणारे आहे !

स्रोत: पीआयबी ( प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ), भारत सरकार.

अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात कोणती क्रियाकलाप योगदान देत आहे हे ट्रॅक करणे कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. ही एक सामान्य विभागणी आहे. आणि ती कोणत्याही आर्थिक क्रियाकलापांना कोणतीही मर्यादा घालत नाही. आर्थिक क्रियाकलाप, त्यांचे प्रवाह आणि परस्परावलंबन लक्षात यावे म्हणून आपल्या समजुतीसाठी हे वर्गीकरण केले जाते.

धन्यवाद..

नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करा 😊