निर्देशांक म्हणजे काय?
सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक (index) आहेत.
(एकवचनी रूप = index ; अनेकवचनी रूप = indices).
निर्देशांक(index) म्हणजे – महागाई, प्रदूषण इत्यादीसारख्या वस्तूंच्या मूल्याचे संख्यात्मक प्रतिनिधित्व. ते कालांतराने त्या विशिष्ट मूल्यात होणारा बदल देखील दर्शवते.
मागील पोस्ट मध्ये CPI आणि WPI बद्दल वाचले, CPI निर्देशांक आणि WPI निर्देशांक आपल्याला महागाई आणि चलनवाढीतील बदल याबद्दल सांगतात.
हे देखील वाचा 👉 सीपीआय आणि डब्ल्यूपीआय – महागाई चे निर्देशांक.
‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ हे आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक आहेत. जे सिक्युरिटीज मार्केटच्या (शेअर बाजार /शेअर मार्केट) एकूण हालचालींचे प्रतिनिधित्व करतात.
सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही भारतातील टॉप लिस्टेड (listed) कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात. हे दोन्ही निर्देशांक संपूर्ण शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करतात.
या निर्देशांकांची हालचाल भारतीय शेअर बाजाराची एकूण कामगिरी ठरवते.
Listed Company/ ‘सूचीबद्ध कंपनी’ म्हणजे काय ?
सूचीबद्ध कंपनी म्हणजे असा व्यवसाय जो NSE किंवा BSE सारख्या स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असतो. सेबी (SEBI) सारखा शेअर बाजार नियामक अश्या कंपनीची नोंदणी करतो आणि त्या कंपनी/व्यवसायाला स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतःची नोंदणी करण्याची परवानगी देतो. सूचीबद्धतेच्या या प्रक्रियेमुळे कंपनी आपले शेअर्स सामान्य लोकांना विकू शकते. कंपनीची नोंदणी झाल्या नंतर, कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात व्यापारासाठी उपलब्ध होतात. सूचीबद्ध कंपन्यांना शेअर बाजार नियामकाचे म्हणजेच SEBI चे नियम पालन करावे लागते.
हे देखील वाचा -➡️ शेअर बाजार म्हणजे काय?
हे देखील वाचा 👉 सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)
सेन्सेक्स आणि निफ्टी
Sensex/सेन्सेक्स – बीएसई (BSE) चा निर्देशांक
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/Bombay Stock Exchange (BSE) हे महाराष्ट्रातील मुंबई येथील स्टॉक एक्सचेंज आहे.
सेन्सेक्स हा बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) चा प्रमुख निर्देशांक आहे.
हा निर्देशांक (सेन्सेक्स) मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील शीर्ष 30 सूचीबद्ध कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो.
1986 मध्ये – सेन्सेक्सची सुरुवात झाली. सेन्सेक्स हा एक फ्री-फ्लोट, मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट इंडेक्स आहे.
‘सेन्सेक्स’ हे नाव ‘सेन्सिटिव्ह’ (sensitive) आणि ‘इंडेक्स’ (index) या दोन शब्दांपासून आले आहे. म्हणून,
Sensex = Sensitive + index. ➡️ हा निर्देशांक, जो शेअर बाजाराची संवेदनशीलता दर्शवतो.
बीएसईमध्ये हजारो कंपन्या सूचीबद्ध आहेत. परंतु सेन्सेक्स अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमधील केवळ शीर्ष 30 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो.
वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कंपन्यांची अशी निवड प्रत्यक्षात एकूण शेअर बाजाराच्या हालचालीचे प्रतिनिधित्व करते.
येथे तपासा ⇾ बीएसई सेन्सेक्स ३० कंपन्या
येथे तपासा ⇾ बीएसईच्या टॉप १०० कंपन्या
शीर्ष ३० कंपन्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात जसे की आयटी (IT), बँकिंग, ऑटोमोबाईल, वित्त (Finance), सिमेंट, दूरसंचार, ऊर्जा, एफएमसीजी (FMCG), पेट्रोलियम, ग्राहकोपयोगी वस्तू, औषधनिर्माण इत्यादी. ‘बीएसई सेन्सेक्स’ मध्ये या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या आहेत.

भारतातील शेअर बाजारातील एक महत्त्वाचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सची वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. जून आणि डिसेंबरमध्ये, सेन्सेक्स एक पुनरावलोकन प्रक्रिया पार पाडतो जिथे कंपन्यांचे त्यांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले जाते.
या मूल्यांकनाच्या आधारे कंपन्यांना काढून टाकले जाऊ शकते किंवा निर्देशांकात समाविष्ट केले जाऊ शकते. सेन्सेक्समध्ये कंपनीचा समावेश कायमचा नाही.
जर एखाद्या कंपनीने काही कालावधीत खराब कामगिरी केली तर ती सेन्सेक्स यादीतून काढून टाकली जाऊ शकते.
ही प्रक्रिया सुनिश्चित करते की निर्देशांक बाजारातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो.
निफ्टी – एनएसईचा निर्देशांक
निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज/National Stock Exchange (NSE) चा प्रमुख निर्देशांक आहे. NSE हा मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक स्टॉक एक्सचेंज आहे.
निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) वरील शीर्ष ५० सूचीबद्ध कंपन्यांचे (Listed Comapnies) प्रतिनिधित्व करतो. तो १९९६ मध्ये सुरू झाला.
‘निफ्टी’ हे नाव ‘नॅशनल’ आणि ‘फिफ्टी’ या दोन शब्दांपासून बनले आहे.
म्हणून, Nifty = National + Fifty.
हा निर्देशांक NSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५० कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो.
सेन्सेक्सप्रमाणेच, निफ्टी देखील अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील कंपन्यांना विचारात घेते.
समान निकषांचे पालन केले जाते आणि निफ्टी ५० निर्देशांकासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५० कंपन्यांची निवड केली जाते.

येथे तपासा ⇾ एनएसई निफ्टी कंपन्या
निफ्टी ५० यादीची पुनरावृत्ती दर सहा महिन्यांनी, म्हणजे वर्षातून दोनदा होते. एनएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केलेली यादी पाहता येईल.