- शेअर बाजार किंवा स्टॉक मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते.
- मुळात, ते शेअर्स, बाँड्स, सिक्युरिटीज इत्यादी खरेदी आणि विक्रीसाठी एक बाजारपेठ आहे.
- शेअर म्हणजे मालकीचे एकक, आणि स्टॉक म्हणजे शेअर्स जारी करणारी कंपनी.
शेअर बाजाराला स्टॉक एक्सचेंज असेही म्हणतात . उदा. एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज), बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज).
बाँड्स आणि सिक्युरिटीज म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी, आमचा लेख वाचा – सरकारी सिक्युरिटीज
शेअर म्हणजे काय? 👇
- शेअर्स हे कंपनीच्या मालकीचे काही भाग दर्शवतात. शेअर हे कंपनीच्या मालकीचे एकक (unit ) असते.
- जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीचे शेअर्स खरेदी करते तेव्हा ती व्यक्ती कंपनीच्या थोड्या हिस्स्याची मालक होते.
जर एखाद्या व्यक्तीकडे कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी २०% शेअर्स असतील तर याचा अर्थ असा की ते कंपनीचे २०% मालक आहेत.
- शेअर बाजार हा एक दुय्यम बाजार आहे म्हणजे secondary market आहे.
जिथे शेअर्स, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीजची खरेदी-विक्री त्यांच्या सुरुवातीच्या इश्यू (issue) नंतर होते. गुंतवणूकदार (investors) या सिक्युरिटीजचा व्यापार आपापसात करतात, त्या जारी करणाऱ्या कंपनीकडून डायरेक्ट विकत घेत नाही.
- जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच जनतेला शेअर्स जारी करते तेव्हा गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी करतात आणि असे व्यवहार प्राथमिक बाजारात होतात म्हणजे primary market मधे.
- पूर्वी खरेदी केलेले शेअर्स दुय्यम बाजारात (शेअर मार्केट) इतर गुंतवणूकदारांना विकले जाऊ शकतात.
शेअर्स खरेदी किंवा विक्री साठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, हे तुम्ही घरीच तुमच्या मोबाईल फोन वर करू शकता.
हे शेअर बाजार कुठे आहेत ?
२००० च्या दशकापर्यंत शेअर बाजार किंवा कोणतेही प्राथमिक किंवा दुय्यम बाजार हे भौतिक ठिकाणे होते.
नंतर भारतातील शेअर बाजाराचे डिजिटायझेशन टप्प्याटप्प्याने झाले. 👇
१९९४ मध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन आधारित ट्रेडिंग सुरू केले.
१९९५ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) नेही असेच केले. BOLT हे BSE चे ट्रेडींग सिस्टम आहे.
वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी, शेअर्सचे इंटरनेट आधारित ट्रेडिंग खऱ्या अर्थाने एप्रिल २००० मध्ये सुरू झाले. २००० पूर्वी ते ऑफलाइन असायचे.
BSE (Bombay Stock Exchange) महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे आणि NSE (National Stock Exchange) दिल्ली येथे आहे. आज या बाजारपेठांमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री डिजीटल पद्धतीने होते.
शेअर्स आता पूर्णपणे डीमटेरियलाइज्ड आहेत (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात = कोणतेही भौतिक कागदपत्रे नाहीत). म्हणजेच शेअर्स फक्त डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.

बीएसई आणि एनएसई दोन्ही सरकारी आहेत की खाजगी ?
- बीएसई आणि एनएसई दोन्ही खाजगी कंपन्या आहेत .
- एनएसई आणि बीएसई दोन्ही नफा कमावणाऱ्या कंपन्या आहेत . BSE & NSE इतर प्राइवेट कंपन्या सारख्याच आहेत.
- जरी दोन्ही स्टॉक एक्सचेंज खाजगी असले तरी सरकारद्वारे मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जातात.
- ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी / SEBI) ही स्टॉक एक्सचेंज – बीएसई आणि एनएसई – चे नियमन करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेली संस्था आहे.
दोन्ही स्टॉक एक्सचेंज सेबीच्या (SEBI) कठोर नियमनाखाली काम करतात.
SEBI बद्दल माहिती साठी कृपया हि पोस्ट वाचा ⇾ सेबी (SEBI) .
शेअर बाजार किंवा शेअर बाजार हा शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा बाजार आहे. शेअर्स कसे खरेदी-विक्री करायचे? ⇾ आपण आमच्या पुढील पोस्टमध्ये याबद्दल जाणून घेऊ.
3 thoughts on “शेअर बाजार / स्टॉक मार्केट म्हणजे काय ? What is the Share Market (Stock Market) ?”