अर्थव्यवस्था आणि शिक्षण हे विकासाचे दोन आधारस्तंभ आहेत. विकासाचे आधारस्तंभ असल्याने, शिक्षण आणि अर्थव्यवस्था दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.
देशाच्या विकासाचा पाया म्हणजे शिक्षण; ते नैतिक, शाश्वत आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा करते.
अर्थव्यवस्था ही मागणी आणि पुरवठ्यावर (demand and supply) अवलंबून असते आणि शिक्षण क्षेत्र हे माणसाच्या सर्वांगीण विकासावर काम करत असते.
आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता का आहे?
- शिक्षण आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही अर्थातच एकमेकांना पूरक आहेत. आपण शिकतो (शिक्षण क्षेत्र) आणि नंतर आपल्याला कमवावे (आर्थिक क्षेत्र) लागते.
- परंतु बहुतेक वेळा त्यांच्या मध्ये अंतर असते. मागणी आणि पुरवठ्या मध्ये अंतर (गॅप)
- अर्थव्यवस्थेला विकासासाठी नवीन कौशल्ये (skills) आणि संसाधनांची (resources) आवश्यकता असते आणि बऱ्याचदा शिक्षण क्षेत्र मागणीनुसार कौशल्ये प्रदान करण्यात अपयशी ठरते.
- ही तफावत एका साध्या कारणामुळे असते, म्हणजेच, आवश्यक बदलांशी आपण किती लवकर जुळवून घेतो adapt करतो.
- बहुतेक वेळा अर्थव्यवस्था शिक्षण क्षेत्रापेक्षा अधिक वेगाने बदलते.
- आर्थिक क्षेत्र हे प्रत्यक्ष घडणाऱ्या बदलांबद्दल संवेदनशील असते, कारण आर्थिक क्षेत्रात लवकरात लवकर निकाल हवे असतात.
- एखादा कारखाना कामगारांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत वाट पाहू शकत नाही आणि नंतर त्यांचे काम करू शकत नाही. एखादा कारखाना फक्त त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्यांच्या कडून काम पूर्ण करून घेतात.

दुसरीकडे, शिक्षण क्षेत्र हळूहळू आवश्यक बदलांशी जुळवून घेते परंतु अर्थव्यवस्थेद्वारे निर्माण होणारी मागणी प्रमाणपत्रे आणि त्या सर्व गोष्टीं शिवाय देखील पूर्ण केली जाते.
हे शैक्षणिक क्षेत्रातील दिल्या जाणाऱ्या कौशल्यांमध्ये व उद्योगाच्या गरजांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये स्पष्ट अंतर दर्शवते.
आणि ही आधुनिक समस्या नाही; तिचा इतिहास खूप जुना आहे. १०० वर्षांपूर्वीही, अर्थव्यवस्थेतील बदलांशी जुळवून घेण्यात अयशस्वी झाल्यामुळे लोकांनी त्यांच काम गमावल होत.
उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीने (१७६०-१८४०) औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी यंत्रे (machines) आणली. अनेक कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर ज्यांनी ही यंत्रे कशी चालवायची हे शिकले ते बदलातून वाचले. नवीन गोष्टी आणि काम शिकणार्यांना नवीन काम व नौकरी मिळाली.
शिक्षण आणि अर्थव्यवस्थेचा उद्देश-
शिक्षण
- अनेक विषय शिकणे, चांगले गुण मिळवणे, परीक्षा उत्तीर्ण होणे आणि उच्च वर्गात प्रगती करणे हे शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे.
- शेवटी, आपल्याला पदवी प्रमाणपत्र (degree certificate) मिळते आणि त्यावर आधारित, आपण रोजगार किंवा कमाईच्या संधी शोधतो (शोधण्याचा प्रयत्न करतो).
- पण हा शिक्षणाचा मुख्य उद्देश नाही. शैक्षणिक पात्रता आणि पदव्यांवर आधारित कमाई करता येते, परंतु तो शिक्षणाचा मुख्य उद्देश किंवा शिक्षणाचा एकमेव उद्देश नाही.
- शिक्षणाचा मुख्य उद्देश आपल्या मध्ये समझ विकसित करणे आणि त्यांना जगाबद्दल अधिक जागरूक करणे हा आहे.
- शिक्षण म्हणजे चांगली मूल्ये विकसित करणे, आपल्या भावी पिढ्यांना दयाळू आणि प्रामाणिक बनवणे.
- अन्यथा, आपण अधिक बुद्धिमान सैतान निर्माण करू शकतो.
अर्थव्यवस्था
- अर्थव्यवस्था ही एक व्यवस्था आहे, अशी व्यवस्था जी आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनांचे (resources) नियमन करते.
- मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी तयार केलेली व्यवस्था म्हणजेच अर्थव्यवस्था.
- ही आर्थिक व्यवस्थाच आहे जी पैशाचे नियमन करते; ती पैशाचा पुरवठा नियंत्रित करते
- आधुनिक जगात, सर्वकाही अर्थव्यवस्थेभोवती फिरत आहे. अर्थव्यवस्था अशी गोष्ट आहे जी राष्ट्राची शक्ति परिभाषित करते.
- अर्थव्यवस्थाच आपल्याला आपल्या कामासाठी पैसे देते.
- आपण अर्थव्यवस्थेला जे देतो (skills, time, knowledge, etc.) त्यावरून आपण आपले पैसे मिळवतो आणि अर्थव्यवस्था आपल्याला आपल्या कामाच्या गुणवत्तेनुसार (quality) पैसे देते.
- प्रोत्साहनांशिवाय (incentives) कोणी का काम करेल? आणि कोणत्याही कौशल्याशिवाय कोणी का पैसे देईल?
शिक्षण आणि अर्थव्यवस्थेबद्दल
अर्थव्यवस्थेद्वारे निर्माण होणारी मागणी ही बदलासाठी एक ट्रिगर म्हणून काम करते. अशा संक्रमणाच्या (transition phase/बदलाची सुरुवात) सुरुवातीच्या टप्प्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत नेहमीच असते.
नंतर आवश्यक/मागणी केलेली संसाधने, कौशल्ये इत्यादी एक नवीन सामान्य व्यवस्थेचा भाग बनतात.
- उदाहरण:
- समजा एखाद्या उत्पादक कंपनीला एका विशेष मशीनची आवश्यकता आहे जी सध्या उपलब्ध नाही. उत्पादन वाढवण्यासाठी, कंपनी हे मशीन विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
- अभियंते आवश्यक मशीन तयार करण्याचे काम हाती घेतील, परंतु त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. या विकास टप्प्यात, मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते.
- अखेर, विद्यार्थी किंवा त्याच अभियांत्रिकी टीमने मशीन यशस्वीरित्या तयार केली.
- त्यानंतर, मशीन चालवण्यास सक्षम कुशल कामगारांची (skilled workers) मागणी असेल. शिवाय, मशीनला नियमित देखभालीची आवश्यकता असेल, ज्यामुळे मशीन दुरुस्तीमध्ये (repair and maintenance) तज्ञ व्यावसायिकांची आवश्यकता निर्माण होईल.
- शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील अंतराची उदाहरणे
- 1. औद्योगिक क्रांती (१८६० नंतर) –
- अर्थव्यवस्थेतील संक्रमणकालीन काळाचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे जिथे आपण शिक्षण आणि प्रत्यक्ष बदलांमधील मागणी-पुरवठा तफावत स्पष्टपणे पाहू शकतो. अर्थव्यवस्थेचे यांत्रिकीकरण सुरू होताच नवीन तंत्रज्ञान आणले गेले. यंत्रांमुळे हस्तकला आणि इतर पारंपारिक उत्पादन प्रणाली कमी फायदेशीर झाल्या.
- २. दुसरी औद्योगिक क्रांती (१८७० नंतर) –
- वैज्ञानिक शोधांच्या काळात औद्योगिक उत्पादनाचे संपूर्ण चित्र बदलले. नवीन संशोधन आणि शोधांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. अर्थव्यवस्था जलद बदलांमधून जात होती आणि त्यामुळे स्पष्टपणे तीच दरी निर्माण झाली.
- ३. डिजिटल युग (१९९० नंतर) –
- संगणकांच्या वापरामुळे खूप मोठी प्रगती झाली. जगभरातील लोकांना या उच्च-तंत्रज्ञानाच्या यंत्रे (संगणक) शिकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
- सुरुवातीला कोणत्याही अभ्यासक्रमात संगणक कसे वापरायचे आणि कसे चालवायचे हे शिकवले जात नव्हते. संगणकांच्या वापराच्या बाबतीत अजूनही ही तफावत आहे. अनेक विद्यार्थ्यांना, अगदी काम करणाऱ्या व्यावसायिकांनाही, मूलभूत संगणक वापरण्यात अडचणी येतात.
कौशल्य विकास – स्किल इंडिया हब साठी भारत सरकारची वेबसाइट पहा.
२०२६ मध्ये आवश्यक असलेले उत्पादन कौशल्य येथे क्लिक करा
हा एक प्रवाह (flow) आहे, एक चक्र (cycle) आहे; याला वेळ लागतो. पण अर्थव्यवस्थेतील मागणी आणि शिक्षण क्षेत्रातील पुरवठ्यात नेहमीच अंतर राहील.
का? कारण अर्थव्यवस्थेला उत्पादन देण्यासाठी जलद कृतींची आवश्यकता असते आणि ती इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वेगाने बदलत असते.
आपल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला पाठिंबा देणाऱ्या बदलांना आपण किती लवकर स्वीकारतो आणि त्यांच्याशी जुळवून घेतो यावर हे सर्व अवलंबून आहे.
शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील अंतराच्या समस्येवर आपण चर्चा केली. यावर संभाव्य उपाय काय आहे?
हा उपाय मूलभूत आहे पण प्रत्यक्षात तो अंमलात आणणे कठीण आहे.
कौशल्य-आधारित अर्थव्यवस्था (skill-based economy). आणि पदवी किंवा प्रमाणपत्र-आधारित प्रणाली नाही .
कौशल्य-आधारित अर्थव्यवस्थेबद्दल आपण भविष्यातील पोस्ट मध्ये चर्चा करू.
1 thought on “अर्थव्यवस्था आणि शिक्षण / Economy and Education”