GST 2.0 – the reforms/ जी.एस.टी. मधील बदल –

GST 2.0 – जी.एस.टी. मध्ये काय बदल झाला आहे ?..

जुलै,2017 पासून GST भारतात लागू झाला. आता सप्टेंबर,2025 मध्ये GST 2.0 लागू होत आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला लक्षात घेता सरकारने GST दराच्या स्लॅब मध्ये परिवर्तन केले आहे.

आता सध्या GST च्या 4 स्लॅब आहेत(5%,12%,18%,28%). GST परिषदेने GST मध्ये सुधारणा केली आहे. 22 सप्टेंबर,2025 पासून या सुधारणा संपूर्ण भारतात लागू होतील. 22 सप्टेंबर,2025 पासून GST च्या फक्त 2 मुख्य स्लॅब राहतील. 5% आणि 18% अश्या फक्त दोन मुख्य स्लॅब राहतील. source: PIB (पत्र सूचना कार्यालय), भारत सरकार

फायदा कोणाला होणार ?

ग्राहकांना नक्कीच याचा फायदा होणार. आणि व्यापारी वर्गालाही फायदा होणार.

ज्या वस्तू किंवा सेवा 28% स्लॅब मध्ये होत्या त्या 18% मध्ये येतील. म्हणजेच माल स्वस्त होणार. 12% स्लॅब मधील वस्तू 5% मध्ये येतील. काही महत्वाच्या वस्तूंवर तर GST लागणारच नाही. 0% GST

  • तेल, साबण,शॅम्पू, टूथब्रश, इ. 18% वरून 5% वर येतील. म्हणजेच किराणा मालातील बहुतेक वस्तू स्वस्त होतील.
  • जीवनावश्यक औषधी 12% वरून 5% वर येतील. काही औषधी तर 0% GST मध्ये येणार.
  • दुचाकी गाड्या,छोट्या कार, टी.व्ही., ए.सी., सीमेंट इ. वस्तू 28% वरून 18% वर येतील.
    • म्हणजे घर बांधन, कार घेण स्वस्त होणार आहे. (22 सप्टेंबर,2025 पासून)
  • शेतात लागणारे मशीन, कृषी सिंचन साहित्य इ. वर 12% GST नाही तर फक्त 5% GST लागेल.
  • चिवडा, सॉस, बिस्किट, चॉकलेट,लोणी,तूप, इ. वर आता फक्त 5% GSTलागणार. जे कि अगोदर 12-18 % लागायचे.
  • तंबाकू, पान मसाला, चैनीच्या वस्तू, 4 मीटर पेक्षा लांब कार, 350 cc पेक्षा जास्त क्षमता असणारे दुचाकी, इ. वस्तूंवर 40% GST लागणार आहे.
    • अगोदर अश्याच वस्तूंवर सुमारे 50% GST होता.
  • वैयक्तिक स्वास्थ्य विमा, वैयक्तिक जीवन विमा यांवर 0% GST. जेणेकरून वैद्यकीय दृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होणार.

सरकारच्या वेबसाईट वर 22 सप्टेंबर,2025 पासून कोणत्या वस्तूवर किती GST लागणार आहे ते चेक करू शकता — PIB- GST



नवीन अपडेट साठी आपले WhatsApp चॅनेल जॉइन करा.


सरकारला फायदा कसा होणार ?

सरकारच्या तिजोरीमध्ये दर महिन्याला सरासरी 1.84 लाख करोड (केंद्र आणि राज्य सरकारे मिळून) GST जमा होतो.

  • परंतू ‘GST 2.0’ मुळे सरकारला कमी टॅक्स प्राप्त होण्याची शक्यता आहे.
    • कारण बहुतांश वस्तू आता छोट्या टॅक्स स्लॅब मधे शामिल झाल्या आहेत.
  • परंतू हे नुकसान सरकारला अधिक काळ सहन करावे लागणार नाही.
    • कारण वस्तू स्वस्त झाल्यामुळे ग्राहक अधिक वस्तू खरेदी करणार. ज्यामुळे सरकारला GST महसूल मध्ये होणारा घाटा जाणवणार नाही.

आपण जास्त खरेदी करू कारण किंमत कमी झालेली आहे. आणि म्हणून कराची टक्केवारी जरी कमी झाली तरी कर(GST) देणारे ग्राहक वाढतील.

  • जागतीक परिस्थिती पाहता सरकारने हा उत्तम निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 अमेरिकाने 50% टॅरीफ(Tariff) भारताच्या मालावर अमेरिकामध्ये लावले आहे.
    • म्हणजेच भारताच्या वस्तू अमेरिकेत महाग होतील. अमेरिकेतील रहिवासी भारताच्या वस्तू न घेता स्वस्त अमेरीकी वस्तू खरेदी करतील.
  • GST कमी करण्याचा डाव खेळून आपण अमेरिकेने लावलेल्या टॅरीफ ला काउंटर करू शकतो.

म्हणजेच टॅरीफ/Tariff मुळे अमेरिकामध्ये भारताचा माल कमी विकला जाईल. तर भारताला नुकसान होईल. मग भारताचा माल भारतात विकला गेला पाहिजे. आणि भारतात अधिक माल विकला जावा म्हणून GST कमी करणे गरजेच होत!

भारतीय अर्थव्यवस्थेवर काय प्रभाव होणार ?

  • शिक्षण साहित्य स्वस्त होणार. कंपास बॉक्स, गणितीय उपकरण इ. 12% वरून 5% GST स्लॅब मध्ये येणार.
    • पुस्तके,शार्पनर,पेन्सिल,खोडरबर,नकाशे, शैक्षणिक चार्ट, इ. वर शून्य टक्के GST.
  • गृहनिर्माण क्षेत्र, पायाभूत सुविधा यांचा निर्माण कमी खर्चात होईल.
    • मार्बल, ग्रेनाईट, विटा आता 5% GST लागणार. अगोदर 12% होता.
    • सीमेंट वर आता 18% GST लागणार. जो 28% होता.
  • भारताला आयात आणि निर्यात मध्ये होणारा घाटा या कमी GST दरामुळे सावरता येईल.
    • आपल्या देशाचा माल आपणच अधिक खरेदी करू. कारण किंमत कमी झालेली आहे.
  • बस,ट्रक,तीन चाकी वाहन यांवर आता 18% GST . आधी 28% होते.
    • यांच्या ऑटो पार्ट्स वरही 18% GST.
    • म्हणजे देशात वाहतूक करणारे वाहन वाढणार आहेत.
  • दिवाळी च्या आधी अशी टॅक्स मध्ये कमी करणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी उत्तम ठरणार.
    • दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्री वाढणार. अर्थव्यवस्थेला चालना (boost) मिळणार.
    • तुम्ही जर मोटर-सायकल किंवा कार घेणार असाल तर 22 सप्टेंबर,2025 पर्यंत संयम ठेवा. या तारखेनंतर तुम्हाला गाड्या स्वस्तात मिळतील.

देशातील आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी टॅक्स संबंधित नियम बदलत असतात. असे बदल करणे आवश्यक असते. यामुळेच देशातील अर्थव्यवस्था स्थिर राहते. आपण ग्राहक म्हणून आणि जागरूक नागरीक म्हणून या गोष्टींकडे लक्ष दिल पाहिजे.

2 thoughts on “GST 2.0 – the reforms/ जी.एस.टी. मधील बदल –”

  1. Articles are well versed and informational ,Easy to understand with use of user friendly language .if possible use data interpretation flow diagram to understand relation from one point to another it will provide good approach for presenting your idea over the topic covered .

    Reply

Leave a Comment