GST (जी.एस.टी.): Part 1

GST (Goods & Services Tax) / वस्तू आणि सेवा कर

एका देशात एकच कर प्रणाली असायला पाहिजे, या विचारामुळे GST चा उदय झाला. जी.एस.टी. च्या अगोदर मूल्यवर्धित कर (VAT) प्रणाली होती. VAT(value added tax) पद्धतीमध्ये वेगवेगळ्या राज्यात करांचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे दर होते.

केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून संविधाना मध्ये बदल केले. VAT पद्धत्ती बंद झाली आणि जी.एस.टी. (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली जुलै २०१७ पासून संपूर्ण देशात लागू केली.

GST (जी.एस.टी.) म्हणजे काय ?…

जी.एस.टी. हि एक कर पद्धती (tax system) आहे, ज्यामुळे पूर्ण देशात अप्रत्यक्ष कर एकसमान झाले आहेत. हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवा (goods & services) खरेदी करताना आपण भरतो. VAT, इ. अनेक प्रकारचे टॅक्स आता जी.एस.टी. मध्ये गणले जातात.

जी.एस.टी. हा एक अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे हा कर प्रत्येकाला सारखाच भरावा लागतो. एक व्यक्ती किती पैसे कमवतो त्यानुसार हा कर आकारला जात नाही. तर तुम्ही कोणती वस्तू खरेदी करणार त्यानुसार जी.एस.टी. चे दर बदलतात. या विरुद्ध आयकर(income tax) आहे. आयकर आपल्या वार्षिक उत्पन्नानुसार कमी जास्त होत असतो. आयकर एक प्रत्यक्ष कर आहे.

आपण ‘GST’ उदाहरणातून समजून घेऊ –

जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो किंवा एखादी सर्विस घेतो जसे डॉक्टर कडे उपचार, पाण्याचे फिल्टर सुधारणा, इ. या सर्व वस्तू आणि सेवा आहेत. त्यांच्या खरेदी वर आपण ‘वस्तू आणि सेवा कर’ म्हणजे ‘जी.एस.टी’ भरतो. हा टॅक्स वस्तूच्या किमतीमध्ये अगोदरच जोडलेला असतो.

  • उदा.
    • एक साबण जर ३० रुपयाचा आहे म्हणजे त्या तीस रुपयांमध्ये जी.एस.टी. अगोदरच जोडलेला आहे. वेगळा असा टॅक्स भरण्याची गरज नाही.
    • आपण जेव्हा डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टरने त्याच्या सर्विस चे समजा ५०० रुपये घेतले. म्हणजेच त्यामध्ये जी.एस.टी. आपण भरलेला आहे.

सरकार आपल्या कडून जी.एस.टी. डायरेक्ट घेत नाही. तर व्यापाऱ्याकडून सरकार जी.एस.टी. घेत. व्यापाऱ्या कडून आपण जी वस्तू खरेदी केली त्यात आपण अगोदरच जी.एस.टी. भरलेला असतो. मग व्यापारी त्याचा नफा काढून ठरलेला जी.एस.टी. सरकारला देतो. आणि म्हणून त्याला indirect tax म्हणतात.

जी.एस.टी. किती टक्के लागतो ?

जी.एस.टी. परिषद ठरवते कि कोणत्या वस्तू वर किती टक्के GST लागेल. जी.एस.टी. परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री असतात. परिषद मध्ये प्रत्येक राज्य सरकार मधील अर्थमंत्री/इतर मंत्री सदस्य असतात. वस्तू कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार त्या वस्तू वर GST लागेल. ए.सी.,कार,सिनेमा तिकीट,इ. वर जास्त जी.एस.टी.. मुलभूत वस्तू आणि सेवांसाठी कमी वस्तू आणि सेवा कर.

GST-rates-for-goods
वरील दिलेले GST दर बदलत असतात. image source&credit: paisabazaar.com
GST-rates-for-services
वरील दिलेले GST दर बदलत असतात. image source&credit: paisabazaar.com

GST दराच्या स्लॅब

भारतात जी.एस.टी. दराच्या चार स्लॅब आहेत. ‘स्लॅब’ म्हणजे जी.एस.टी. कोणत्या वस्तूवर किती टक्के लागेल अश्या टक्केवारी चा समूह/ग्रुप.

5%, 12%, 18%, 28% अश्या चार स्लॅब म्हणजेच टक्केवारी चे ग्रुप आहेत. हि टक्केवारी काही एकदम फिक्स नाही. या चार स्लॅब ला अपवाद पण आहेत.

उदा-. सोने किंवा चांदी खरेदी करताना 3% GST लागतो (ऑगस्ट,२०२५). इ.

जी.एस.टी. दराच्या स्लॅब आणि जी.एस.टी. चे दर बदलत असतात. म्हणून आपण सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जी.एस.टी. चे दर वेळोवेळी तपासून घ्यावेत. अधिकृत वेबसाईट : १. https://cbic-gst.gov.in/hindi/gst-goods-services-rates.html


GST चे प्रकार

Types of GST in India
जी.एस.टी. चे ४ प्रकार
  1. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST)
    • CGST केंद्र सरकार जमा करत.
  2. राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST)
    • SGST राज्य सरकारांच्या खात्यात जमा होतो.
  3. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST)
    • IGST केंद्र सरकार जमा करत. आणि राज्य सरकारांना IGST चा अर्धा हिस्सा केंद्र सरकारकडून परत केला जातो.
  4. केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर (UTGST)
    • UTGST केंद्रशासित प्रदेश जमा करतात. म्हणजेच UTGST केंद्र सरकारच्या खात्यात जातो.

आपल्या देशातील अप्रत्यक्ष कर(indirect tax) बद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलं. हा विषय खूप मोठा आहे. म्हणून “जी.एस.टी. part 2” आर्टीकल लवकरच…


नवीन पोस्ट च्या अपडेट साठी आपले WhatsApp चॅनेल जॉईन करा.

10 thoughts on “GST (जी.एस.टी.): Part 1”

Leave a Comment