GST (जी.एस.टी.) : Part 2

GST 2.0

GST part 1 मध्ये आपण पाहिलं कि जी.एस.टी. काय आहे. जी.एस.टी. हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवा यांच्या खरेदी व विक्री वर लागतो. आता आपण GST बद्दल थोड अधिक जाणून घेऊ.

जी.एस.टी. कोणत्या मंत्रालयात जमा होतो ?

जी.एस.टी. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय कडे जमा होतो. तर राज्य सरकार त्यांच्या अर्थ खात्यात SGST जमा करतात.

कर घेण्याचा अधिकार सरकारला कोण देत?

कर आकारण्याचा अधिकार सरकारांना संविधानाने दिला आहे. संविधानाच्या कलम 279A नुसार सरकारला जी.एस.टी. संबंधी अधिकार मिळतात. कलम 279A – महामहीम राष्ट्रपती यांनी GST परिषद स्थापन केलेली आहे.

केंद्र आणि राज्य : GST वितरण

part 1 मध्ये पाहिलं कि GST केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाटला जातो. मग नेमक कोणत्या राज्य सरकारला GST मिळतो?

GST गंतव्य स्थान आधारित कर आहे. म्हणजे ज्या राज्यात खरेदी होते त्या राज्य सरकारला GST मिळतो. देशात कुठेही खरेदी-विक्री झाल्यास केंद्र सरकारला GST मिळतोच.

खाली दिलेले GST चे प्रकार नसून GST चे भाग आहेत –

  1. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) –
    • CGST केंद्र सरकार जमा करत.
  2. राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) –
    • SGST राज्य सरकारांच्या खात्यात जमा होतो.
  3. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) –
    • IGST केंद्र सरकार जमा करत. आणि राज्य सरकारांना IGST चा अर्धा हिस्सा केंद्र सरकारकडून परत केला जातो.
  4. केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर (UTGST) –
    • UTGST केंद्रशासित प्रदेश जमा करतात. म्हणजेच UTGST केंद्र सरकार/केंद्रशासित प्रदेशाच्या खात्यात जातो.

वरील माहितीनुसार आपण समजू शकतो कि CGST आणि SGST सोबत लागतात. कारण CGST-SGST साठी ची परिस्थिती समान आहे. आणि ती म्हणजे एका राज्यात जेव्हा वस्तूचे उत्पादन होते व त्याच राज्यात खरेदी-विक्री होते तेव्हा CGST-SGST असे GST चे सामान भाग होतात.

असेच काही UTGST सोबत पण होते. CGST आणि UTGST सोबत लागतात. जेव्हा वस्तू एका केंद्रशासित प्रदेशात बनते आणि त्याच केंद्रशासित प्रदेशात विकली जाते तेव्हा UTGST- CGST असे GST चे दोन सामान भाग होतात.

म्हणजेच दोघाही परिस्थितीत केंद्र सरकारला GST चा अर्धा हिस्सा भेटतो. तो म्हणजेच CGST.

IGST केव्हा लागतो ?..

1. जेव्हा एका राज्यात बनलेली वस्तू इतर राज्यांमध्ये विकली जाते.

2. जेव्हा एका राज्यात बनलेली वस्तू केंद्रशासित प्रदेशात विकली जाते.

3. जेव्हा एका केंद्रशासित प्रदेशात बनलेली वस्तू इतर राज्यात विकली जाते.

4. जेव्हा एका केंद्रशासित प्रदेशात बनलेली वस्तू दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशात विकली जाते.

IGST च्या परिस्थितीत सुद्धा केंद्र सरकारकला GST चा अर्धा हिस्सा प्राप्त होतो. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांना IGST चा अर्धा हिस्सा मिळतो. वस्तूच उत्पादन करणाऱ्या राज्याला IGST चा अर्धा हिस्सा भेटत नाही. तर वस्तूचा उपभोग घेणाऱ्या राज्यास IGST चा अर्धा हिस्सा भेटतो.

एकूण किती GST सरकारच्या तिजोरीत जमा होतो ?

देशात आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये एकूण Rs.22.08 लाख करोड (केंद्र आणि राज्य सरकारे मिळून) इतका GST जमा झाला होता. एका महिन्यात सरासरी ₹1.84 लाख करोड GST प्राप्त झाला होता– source: भारत सरकार .

ऑगस्ट 2025 महिन्याचे GST Rs.1.86 लाख करोड इतके पोहोचले आहे– source: DD News . हाच पैसा देशातील विविध विकास कामांमध्ये खर्च होतो.

GST मुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अश्या राज्यांना फायदा झाला आहे. कारण या राज्यांमध्ये वस्तू अधिक विकल्या जातात. आणि जे राज्य वस्तूचा उपभोग अधिक करत त्या राज्याला जास्त GST मिळतो.

जी.एस.टी. सारखी कर पद्धत इतर कोणत्या देशात आहे ?..

GST सारखीच अप्रत्यक्ष कर पद्धत्ती जगातील इतर देशांमध्ये खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे. जसे-

  • ऑस्ट्रेलिया मध्ये अधिकतर वस्तू आणि सेवांवर 10% GST लागतो. काही वस्तूंवर 10% हून जास्त/कमी GST पण लागतो.
  • कॅनडा मध्ये GST सारखी पद्धत आहे त्याला “Federal Goods and Service Tax” असे म्हणतात.
  • इंग्लंड (U.K.) मध्ये VAT(Value Added Tax) पद्धत आहे.
  • सिंगापूर मध्ये GST आहे.
  • न्यूझीलंड सुद्धा GST पद्धतीचा वापर करत.
  • फ्रांस प्रथम देश आहे ज्याने GST लागू केले होते.
जी.एस.टी. पद्धत वापरणारे देश.
या देशांमध्ये GST सारखीच कर पद्धत्ती आहे.

6 thoughts on “GST (जी.एस.टी.) : Part 2”

Leave a Comment