जी.डी.पी.(GDP)…..

जी.डी.पी.(GDP) म्हणजे काय ?

सध्या ‘GDP’ हा शब्द आपल्या फार ऐकण्यात येतो, देशाच्या आर्थिक विकासासंबंधी अर्थशास्त्री जी.डी.पी. चे आकडे गृहीत धरतात. टी.व्ही.,वर्तमानपत्रे, मासिक इ. ठिकाणी आपण आपल्या देशाच्या GDP बद्दल पाहतो किंवा वाचत असतो.

भारत सध्या (२०२५) जगातील ४ थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे व भारताचा GDP (Gross Domestic Product) ४.२ ट्रिलियन अमेरीकी डॉलर आहे(Source: IMF).

हे सगळ आपण ऐकतो पण नेमक जी.डी.पी. म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ.

अधिकृत व्याख्या :

‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) म्हणजे ”एका विशिष्ट कालावधीत (सामान्यतः एक वर्ष) देशाच्या सीमेमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य.”

सोप्या शब्दात सांगितलं तर GDP म्हणजे देशात ज्या काही सेवा आणि वस्तू निर्माण होतात त्यांची एकूण MRP किंवा बाजारातील किंमत.

what-is-goods-and-services-picture
वस्तू आणि सेवा यातील फरक

आता… वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे वरील चित्रा मध्ये पाहून आपण समजू शकतो. वस्तू– गाडी, विमान, लेखणी, मोबाईल, इत्यादींचे उत्पादन आणि सेवा– बँक, विमा कंपन्या, वाहतूक, डॉक्टर, इंजीनीयर यांच्या सेवांचे उत्पादन इ. चा समावेश होतो.

अश्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजारातील मूल्य म्हणजेच एका देशाचा GDP होय. इथे ‘अंतिम वस्तू आणि सेवा’ असे म्हटले आहे , फक्त वस्तू आणि सेवा असे वापरले नाही कारण ग्राहक किंवा उपभोक्ता ज्या वस्तू आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी विकत घेतो अश्या वस्तूंना अंतिम वस्तू म्हणतात आणि अश्याच वस्तूंचा समावेश GDP मोजताना करतात.

उदा.- एक कार बनवतांना रबरचे चाक,स्टील,विजेचा बल्ब,काच, इ. वस्तूंचा वापर होतो पण या सर्व वस्तू अंतिम वस्तू नाहीत तर कार अंतिम वस्तू आहे आणि म्हणून फक्त फायनल जी कार तयार होते तिचा समावेश जी.डी.पी.च्या आकडेवारीत होतो आणि कार बनवताना लागलेल्या सर्व सामान आणि वस्तूंची किंमत फायनल कार मध्ये जोडली जाते.

अश्याप्रकारे प्रत्येक वस्तू आणि सेवा जी ग्राहक स्वतःच्या उपयोगासाठी विकत घेतो तिचा समावेश देशाच्या जी.डी.पी.मध्ये होतो. उदा.- जेव्हा आपण एक काच घरात उपयोगासाठी विकात घेतो तेव्हा तो काच एक अंतिम वस्तू म्हणून गृहीत धरला जाईल

परंतू तोच काच एक कार बनवतांना वापरला जाईल तेव्हा तोच काच एक अंतिम वस्तू नसून ती कार अंतिम वस्तू आहे कारण ग्राहक ती कार विकत घेणार आणि त्या कार च्या किमतीत त्या काचेची पण किंमत अगोदरच जोडलेली असणार.

आपण आता हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू

समजा एका देशात फक्त खाली दिलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण होतात आणि दुसरे काहीच निर्माण होत नाही तर त्या देशाच्या GDP ची गणना आपण करू

वस्तू (किंमत रु.)सेवा (किंमत रु)
कार = ५००००डॉक्टर = ५००
टी शर्ट = ४००विमा कंपनी = ९००
मोबाईल = १००००वाहतूक = २५००
वडा पाव = १५आय टी कंपनी = ११००
एकूण = ६०४१५एकूण = ५०००

वरील उदाहरणानुसार त्या देशाचा जी.डी.पी.(एकूण वस्तूंची किंमत अधिक एकूण सेवांची किंमत) = ६५४१५ रुपये . हे फक्त एक उदाहरण आहे, वास्तविक GDP च गणित आणि गणना फार जटील आहे.

GDP गणना: दुसरी पद्धत

• GDP गणना अर्थव्यवस्थेतील तीन क्षेत्रांच्या उत्पादनाची बेरीज करूनही करता येते, अर्थव्यवस्थेला प्रमुख तीन क्षेत्रात विभागले आहे आणि ती तीन क्षेत्रे म्हणजे १.प्राथमिक क्षेत्र, २.द्वितीय क्षेत्र, ३.तृतीय क्षेत्र .

या तीघ क्षेत्रातील एकूण अंतिम उत्पादनाच्या बाजार किमतीची बेरीज म्हणजे GDP .

The three sectors of an economy

GDP चे महत्व आणि मर्यादा –

महत्व– १. जी.डी.पी. देशाच्या आर्थिक स्वास्थ्याचे मानक असते

२. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार दर्शवते.

३. सरकार आणि बँका जी.डी.पी.आकडेवारीचा उपयोग करून आपली धोरणे ठरवतात.

४. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आर्थिक तुलना करता येते.

५. आर्थिक विकास आणि अर्थव्यवस्थेचा आकार यांच्या प्रगतीचा आढावा घेता येतो.

मर्यादा– १. GDP फक्त देशातील एकूण उत्पादनाची किंमत सांगते, परंतु हे उत्पादन देशात कसे वितरीत झाले आहे हे सांगत नाही

२. गैर-बाजार क्रियांचा समावेश जी.डी.पी.मध्ये होत नाही, जसे- घरगुती कामे, स्वयंसेवकांनी केलेलं कार्य, इ.

३. अनाधिकृत पैशाची(black money) गणना यामध्ये होत नाही.

४. सामाजिक आणि पर्यावरण अश्या अमूर्त घटकांचा समावेश नाही.

५. देशातील आर्थिक विषमता जी.डी.पी.द्वारे दर्शवता येत नाही.

महत्वाचे तथ्य –

GDP नुसार जगातील शीर्ष १० देश (source:विकिपीडिया)

देशजी.डी.पी. (ट्रिलियन अमेरीकी डॉलर)
1. USA (अमेरीका)३०.५०
२. चीन १९.२३
३. जर्मनी४.७५
४. भारत४.२०
५. जपान४.१९
६. युनाइटेड किंगडम (UK)३.८४
७. फ्रांस३.२१
८. ईटली२.४२
९. कॅनडा२.२२
१०. ब्राझील२.१२
GDP संदर्भात हा व्हिडिओ युट्युब वर पहा

9 thoughts on “जी.डी.पी.(GDP)…..”

  1. Hey! Do you know if they make any plugins to assist with SEO?
    I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    results. If you know of any please share. Many thanks!

    Reply

Leave a Comment