मिलियन vs बिलियन vs ट्रिलियन-

मिलियन, बिलियन, ट्रिलियन यातील फरक काय

वरील जे विदेशी शब्द आहेत ते आपल्या डोक्यात नेहमी गोंधळ घालतात. मिलियन(million), बिलियन (billion) असे शब्द आर्थिक माहीती देतांना अधिक वापरले जातात. आपण जेव्हा हे शब्द एकतो किंवा पाहतो तेव्हा स्पष्टता कमी आणि गोंधळ जास्त होतो.

आकाशात ताऱ्यांची संख्या सांगतांना असो किंवा मोठ्या उद्योगपतीची संपत्ती सांगतांना किंवा GDP संदर्भात असो या शब्दांचा उपयोग होतोच. या शब्दांचा नेमका अर्थ काय आणि त्यातील फरक काय हे समजून घेऊ.

मिलियन, बिलियन, ट्रिलियन हे तीघ शब्द तीन वेगवेगळ्या संख्या दर्शवतात

एक मिलियन१० लाख (१०,००,०००)
एक बिलियन१०० करोड (१००,००,००,०००)
एक ट्रिलियन १ लाख करोड (१०,००,००,००,००,०००)

‘एक मिलियन’ म्हणजे १० लाख रुपये नाही तर हि फक्त एक संख्या आहे. परंतू जेव्हा आपण ‘एक मिलियन रुपये ‘ म्हणू तेव्हा त्याचा अर्थ ‘१० लाख रुपये ‘ असा होतो. फक्त मिलियन बिलियन असे शब्द वापरून त्यांचा अर्थ पैसे/रुपये नसून फक्त एक संख्या असते.

उदाहरण –

उदा.- राज्यात एक मिलियन गाड्या आहेतम्हणजे राज्यात १० लाख गाड्या आहेत
उदा.- आपल्या शरीरात १ बिलियन पेशी(cells) आहेत म्हणजे आपल्या शरीरात १०० करोड पेशी आहेत
तसेच आकाशात १ ट्रिलियन तारे/चांदण्या आहेत म्हणजेच आकाशात १ लाख करोड तारे आहेत
समजण्यासाठी हे फक्त काही उदाहरण आहेत वास्तविक शरीरात १ बिलियन पेक्षा अधिक पेशी असतात, आकाशात १ ट्रिलियन हून जास्त तारे आहेत…
a girl looking at the night sky
credit&source: Meta ai

म्हणजेच 1 मिलियन आणि 1 बिलियन मध्ये 1000 पटीचा फरक आहे. तसेच 1 बिलियन आणि 1 ट्रिलियन मध्ये सुद्धा 1000 पटीचा फरक आहे.

  • उदा.- 31.5 मिलियन सेकंद ≈1 वर्ष आणि 1 बिलियन सेकंद म्हणजे 31.7 वर्ष !

मिलियन, बिलियन, ट्रिलियन

या वेगवेगळ्या संख्या आहेत हे आपण पाहिलं त्यांच्यातील फरकही पहिला. खरा गोंधळ तेव्हा होतो जेव्हा आपण हे पैशांच्या संदर्भात वापरतो.

जेव्हा एका देशाचे चलन आपण इतर देशांच्या चलनात बदलतो तेव्हा “विनिमय दर” (ecxhange rate) लागतो. एका देशाच्या चलनाची किंमत दुसऱ्या देशाच्या चलनापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.

उदा.- अमेरीकी डॉलर ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयापेक्षा जास्त आहे. म्हणून 1 मिलियन अमेरीकी डॉलर (10 लाख अमेरीकी डॉलर) ची किंमत 1 मिलियन भारतीय रुपये (10 लाख रुपये) पेक्षा जास्त आहे.

  • एक मिलियन अमेरीकी डॉलर = 10 लाख अमेरीकी डॉलर
  • तसेच एक मिलियन भारतीय रुपये = 10 लाख भारतीय रुपये

परंतू, एक मिलियन अमेरीकी डॉलर म्हणजे 10 लाख भारतीय रुपये नाही कारण हे दोन वेगवेगळे चलन आहेत. दोन देशांच्या चलनामध्ये विनिमय दराचा गुणाकार होतो आणि मग त्या चलनाची किंमत ठरवता येते.

an animated man holding the rupee symbol in ane hand and US dollar symbol in the other hand
credit&source: perplexity ai

1 अमेरीकी डॉलर = 87 भारतीय रुपये [ऑगस्ट,२०२५] … हा विनिमय दर लक्षात घेता आपण काही उदाहरण पाहू

उदा.-

  1. 5 अमेरीकी डॉलर = 5 भारतीय रुपये x 87 म्हणजेच 435 रुपये
  2. 1 मिलियन अमेरीकी डॉलर = 1 मिलियन भारतीय रुपये x 87 म्हणजेच 8,70,00,000 (8 करोड 70 लाख रुपये)
  3. 1 बिलियन अमेरीकी डॉलर = 1 बिलियन भारतीय रुपये x 87 म्हणजे 8 हजार सातशे कोटी रुपये (87000000000 रु.)

खाली दिलेल्या लिंक वर US डॉलर ची रुपयामध्ये किंमत पाहता येते –

मिलियन, बिलियन, ट्रिलियन या शब्दांचा नेमका घोळ आता समजला असेल. अधिक माहीती साठी खालील व्हिडिओ पहा


13 thoughts on “मिलियन vs बिलियन vs ट्रिलियन-”

Leave a Comment